माऊली महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने,
ग्लोबयुनिक एडुसोसिअल अँड एमपॉवरमेंट फाउंडेशन, कुरुंदवाड आणि कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाउंडेशनच्या अर्थसाक्षर भारत अभियान या मोहिमेअंतर्गत महिला अर्थसाक्षर मेळावा नुकताच पार पडला.
कुरुंदवाड येथील दत्तमंदिर प्रांगणात पार पडलेल्या या मेळाव्यात यावेळी स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक संचालक राहुल माने, ग्लोबयुनिक एडुसोसिअल अँड एमपॉवरमेंट फाउंडेशनचे संस्थापक सौ. मानसी आणि श्री. उत्कर्ष निकम, लायन्स क्लब कुरुंदवाडच्या आधाक्ष्या ला. सौ. धनश्री गायकवाड, लायन्स क्लब चे झोनल चेअरमन ऍड. श्री. विजय जमदग्नी, पत्रकार संदीप आडसूळ, कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ, पुणेचे अध्यक्ष श्री बाबुराव जोंग आणि बांधकाम व्यावसायिक गायकवाड उपस्थित होते.
Share This News