विनर्स जॉय ऑफ गिविंग आणि कुरुंदवाड परिसर मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील 27 गावातील 125 विद्यार्थ्यांना (गरीब, होतकरू, तसेच पालकांचे छत्र हरवलेल्या) दत्तक योजनेचा शुभारंभ शैक्षणिक साहित्य देऊन शनिवारी दिनांक 29 जून रोजी करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड, सीताबाई पटवर्धन हायस्कूल कुरुंदवाडआणि विद्यामंदिर खिद्रापूर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक वाटचालीस अडथळा येऊ नये तसेच त्यापैकी कोणी शिक्षण अर्धवट सोडू नये आणि ग्रामीण भागातील मुलांनी प्रगती करावी या चांगल्या हेतूने विनर्स जॉय गिविंग चे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील उद्योजक तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्या फाउंडेशन मार्फत काम करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला.
साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड मध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रदीप पाटील, शिवछत्रपती अवार्ड विजेते, चेअरमन स्वातंत्र्य सेनानी कै श्रीपाल आलासे काका अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, कुरुंदवाड आणि श्री संदीप अडसूळ, ज्येष्ठ पत्रकार, संपादक मराठी एस न्यूज उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमांमध्ये साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाड चे संस्थापक श्री अजित पाटील, कुरुंदवाड परिसर मित्रमंडळाचे कार्यवाह श्री प्रशांत पाटील, विनर्स जॉय ऑफ गिविंग मार्फत कुरुंदवाड मधून सौ मानसी व श्री उत्कर्ष निकम, पुणे येथून सौ रीमा व श्री राहुल माने, मुंबई येथून श्री आझाद येतूसकर व कुमारी भूमी देडिया, रायगड येथून श्री राकेश म्हात्रे, भिवंडी येथून श्री पंकज गायकर, सातारा येथून श्री अक्षय सावंत, सोलापूर येथून डॉक्टर सुधीर घोडके, दापोली येथून कुमारी सानिका बांद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
वरील मान्यवरांच्या हस्ते या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी श्री पाटील सर यांनी आयुष्यात पहावे लागणारे मोठे स्वप्न हे मोठे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारे गुरु आणि गुरूंच्या मार्गदर्शन चे महत्व तसेच जेवढे गुरु गरजेचे तेवढेच तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत, चिकाटी आणि जिद्द किती महत्त्वाची आहे या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच विनर्स जॉय ऑफ गिविंग चे कौतुक केले.
श्री संदीप अडसूळ यांनी शालेय वयात मोठे स्वप्न पाहण्याची गरज आणि ती स्वप्न कसे साकार करावे याबद्दल स्वतःच्या आयुष्यातील काही आठवणी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या. तसेच पुस्तके हे डोक्यावर घेण्याची गरज नसून डोक्यात घेण्याची गरज आहे असे अमूल्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थ्यांच्या विचारांमधील नकारात्मकता काढण्यासाठी आणि आई-वडील व गुरूजन यांच्यासोबत चे नाते दृढ करण्यासाठी विनर्स जोर ऑफ गिविंग परिवारातर्फे शाळेमध्ये मेडिटेशन चा कार्यक्रम घेण्यात आला. या मेडिटेशनच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आणि प्रमुख अतिथी यांनी मनापासून सहभाग घेतला.
तसेच याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी निर्मळे, शिक्षक, इतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनर्स जॉय ऑफ गिविंग परिवारातर्फे संस्थेला भारत मातेची मूर्ती देण्यात आली. प्रसन्न वातावरणात भारत मातेच्या आरतीचे गायन करण्यात आले. भारतीय मूल्य जपावी आणि सगळ्यांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना भारत मातेकडे करण्यात आली.
शाळेचे शिक्षक श्री शितल हळींगळे यांनी आभार मानून कार्यक्रमची सांगता केली.
Share This News